29 मार्च 2025 रोजी सूर्यग्रहण होत आहे. हे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल. 4 वाजून 17 मिनिटांनी ग्रहणाचा महत्त्वाचा बिंदू असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी सूर्यग्रहण संपेल. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या भारतामध्ये सूर्यग्रहणाचे कुठल्याही प्रकारचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही असे पंचांगकर्ते म्हणतात.
हे सूर्यग्रहण कॅनडा पूर्व, उत्तर रशिया, बहुतेक सर्व युरोप देश, ईशान्य उत्तर अमेरिका, वायव्य आफ्रिका येथे दिसू शकते. आपण ग्रीनविच स्थळ बघून सूर्यग्रहणाच्या वेळेनुसार जर कुंडली मांडली तर त्यानुसार काय काय होऊ शकते हे आपल्याला आता बघायचं आहे. सूर्यग्रहणावरून येणार्या काळातली देश-विदेशातील अनेक भाकिते केली जातात. सूर्यग्रहणाच्या अभ्यासासाठी अमांत कुंडलीचा आधार घेतला जातो. ह्या कुंडल्यांच्या आधारे घटनांचा मागोवा घेतल्यामुळे आपल्याला बर्यापैकी सावधता बाळगता येऊ शकते. हीच या ज्योतिषशास्त्राची महती आहे.
1 एप्रिल 2024 रोजी मी भूकंपाविषयी कोणत्या कोणत्या देशांमध्ये भूकंप होईल, कुठल्याही प्रकारचे आघात / घातपात होतील अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला होता. त्याच्या धार्मिक विवादाबद्दल होते. बर्यापैकी आपण अनेक देश अनेक स्थळ शोधू शकलो. त्याचप्रमाणे आताही आपण प्रयत्न करणार आहोत. या होणार्या सूर्यग्रहणाचं वैशिष्ट्य म्हणजे सहा ग्रह एका राशीमध्ये येत आहेत. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची घटना आहे. ते कोणते ग्रह आहेत आणि ते कुठल्या स्थानात आहेत किंवा कुठल्या राशीत आहे याबद्दलही आपण बघणार आहोत. त्याच ठिकाणी मीन राशीमध्ये हे जे सहा ग्रह एकत्र आहेत, ह्याच मीन राशीमध्ये अमावस्या पण आहे आणि ग्रहणपण आहे. मीन राशी मध्ये रवी, वक्री बुध, वक्री शुक्र, राहू आणि नेपच्यून असे ग्रह आहेत, त्याचबरोबर शनि सुद्धा असणार आहे. सूर्यग्रहणाच्या वेळेला मात्र शनी हा कुंभ राशीत 29.58 कलावर आहे आणि लगेचच तोही मीन राशी मध्ये प्रवेश करत आहे. गुरु आणि हर्षल असे दोन ग्रह वृषभ राशित आहेत. मंगळ हा मिथुन राशी मध्ये आहे आणि राहूच्या समोर स्वाभाविकच केतू हा कन्या राशित आहे. मी ग्रहांची मांडणी सांगितली कारण ग्रहणाच्या वेळेला कोणते ग्रह कुठल्या राशीत आहेत याबद्दल आपण बघितलं. जेव्हा मेदनीय विचार केला जातो, म्हणजेच अर्थात पृथ्वीचा, वैश्विक विचार केला जातो तेव्हा कालपुरुषाच्या कुंडलीचा विचार केला जातो. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार एकाच वेळी सहाही ग्रह, ग्रहण आणि अमावस्या हे मीन राशीत म्हणजेच कालपुरुषाच्या कुंडलीत व्यय अथवा शेवटच्या राशीत होताना दिसत आहेत. मीन राशीचा स्वामी हा गुरु, हर्षल युक्त म्हणजेच पापग्रह युक्त. अत्यंत अस्थिर असणार्या अचानक घटना घडवणार्या हर्षल युक्त आहे. म्हणजे इथे युक्त असा शब्द वापरत आहे. शनी पासून मंगळ मात्र पाचव्या स्थानी आहे. परंतु आपण जेव्हा मीन राशीचा अभ्यास करतो तेव्हा मीन रास ही द्विस्वभावाची रास दिसते. द्विस्वभावाच्या राशीमध्ये जेव्हा असे ग्रहण होते तेव्हा त्याचे परिणाम हे पुढच्या ग्रहणापर्यंत अथवा दीर्घ काळापर्यंत आपल्याला दिसतात. द्विस्वभाव रास असल्यामुळे मिळणारी फळं ही पुन्हा पुन्हा घडताना दिसतात. ग्रहणाच्या वेळी चंद्र म्हणजेच मन हे शनिनक्षत्री आहे आणि त्याचा चरण स्वामी मंगळ आहे. म्हणजे मानसिकता सुद्धा त्यावेळी खूप काही चांगली असेल असं नाही. आपण जर निरीक्षण केलं तर एकंदरीत कुठल्या कुठल्या देशांवर याचे परिणाम होऊ शकतात या गोष्टींचा आपण आता आढावा घेऊया. बरेच जणांना असा प्रश्न पडतो की अशी भाकित ही कायम नकारात्मक किंवा दुःखदायकच का असतात. जसे ग्रह कुंडली मध्ये ज्या अवस्थेत आहेत त्या नक्षत्रात आहे त्याप्रमाणेच भाकित करणे हे ज्योतिषाला क्रमप्राप्त आहे तिथे जर गुरु ग्रहांनी कुठल्याही प्रकारचा आधार दिला किंवा काही आशादायक घटना दिसल्या तर आणि तरच ज्योतिषी म्हणू शकतो की इथे चांगले घडू शकते, परंतु पाप ग्रहांनी ग्रस्त असलेल्या राशी किंवा ते देश हे त्या काळामध्ये दुःखदायक घटनांना सामोरे जातात आणि ज्योतिषाचा प्रमुख उद्देशच असा असावा की, येणार्या ज्या अघटीत घटना आहे त्यांची आधी माहिती देणे. ती 100% अचूक येईलच असं नाही, परंतु त्यांचा उद्देश त्या-त्या देशातील नागरिकांना अथवा तेथील सरकारला संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेता येणे शक्य व्हावे. असे झाले तर या शास्त्राचा उपयोग झाला असं म्हणता येईल.
आपण विचार करू राहू या ग्रहाचा. प्रत्येक ग्रहाला काही ना काहीतरी कारकत्व म्हणजेच त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदार्या दिलेल्या आहेत. त्या ग्रहांवरून आम्ही कुठल्या भाव कुठल्या वस्तू कुठल्या प्रकारचा समाज अशा प्रकारे याचा अभ्यास मांडू शकतो. हा अभ्यास खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यामुळे जसं केतू ग्रहाला ख्रिस्ती लोकांचा अथवा खलिस्तानी लोकांचा म्हटला जातो त्याचप्रमाणे राहू ग्रह हा इस्लामिक ग्रह आहे किंवा बाहेरील देशातून आलेल्या व्यक्तींचा असं त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर गुरु ग्रहाला सनातन धर्म जाणणारा किंवा मानणारा हिंदू असे म्हटलं जातं. येथे मी या गोष्टी फक्त नमूद करू इच्छिते. अशा वेळेला राहू ग्रहाबरोबर शनि हा ग्रह, ज्याला आपण मृत्यूचा कारक म्हणतो तो बरोबर असताना अशा विषयातल्या घटना गांभीर्याने घडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणजेच इस्लामिक आतंकवाद उफाळून येईल. मोठ्या नेत्यांचा मृत्यूची शक्यता असते. शनि हा न्यायाचा कारक पण आहे त्यामुळे शनी हा राहू वर मात करू इच्छितो अथवा अशा घटना घडण्याचा जेथे जेथे प्रयत्न होईल तेथे तेथे नियमानुसार न्यायालयीन आदेशानुसार अथवा सरकारच्या नियमानुसार अनेक अटी / निर्बंध लागू होऊ शकतात. तसेच राहू-शनि युतीमुळे भारताच्या दृष्टिकोनातून भारताच्या उत्तर पश्चिम भागातून शेजारील देशातील आक्रमण अथवा अतिरेकी कारवाया होऊ शकतात. येथेही या शनीला कठोर व्हावे लागणार आहे. शनी जेव्हा 22 एप्रिल रोजी 2 अंश 38 कलांवर जाईल तेव्हा कालसर्प योग तयार होत आहे. यात घाबरण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही, कारण कालसर्पयोग म्हणजे राहू आणि केतू मध्ये कधी ना कधीतरी ग्रह येणारच असतात. ही खगोलीय घटना आहे. त्यामुळे सामान्य जनतेने स्वतःच्या कुंडलीनुसार घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. मगाशी आपण पाहिले की ग्रहण जे होतं ते शनीच्या नक्षत्रात आणि मंगळाच्या चरण स्वामीवर. मंगळ हा शस्त्राचा कारक आहे आणि शनि हा मृत्यूचा कारक आहे. थोडी युद्धजन्य परिस्थिती देशात, जगभरात होऊ शकते. जिथे पोलिसांना किंवा संरक्षण करणार्या जवानांना शस्त्र उचलावे लागू शकते. आपण म्यानमार, थायलंड, बँकॉक या ठिकाणी नुकताच जो भूकंप झाला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यूची संख्या असावी असा अंदाज बांधला जातो आहे. मंगळ हा भूमीचा कारक आहे तसाच शनि हा त्याला छेद देणारा किंवा त्याची हालचाल करायला लावणारा ग्रह आहे त्यामुळे अनेक वेळा मंगळ आणि शनिच्या कुठल्याही प्रकारच्या योगाने भूकंप होताना दिसतात तसेच अमावस्या, पौर्णिमा आणि ग्रहण याच्या पुढे मागे दोन-चार दिवसांमध्ये या घटना होताना दिसतात. मंगळ – क्रूर, हट्टी, अत्यंत चपळ, जमीन, रोग, कफरोग, अग्नी, शस्त्र, घात करणारा, मोडतोड करणारा, पीडादायक, विद्धंसक आहे. जेव्हा शनी मंगळ केंद्रात म्हणजे एकमेकांपासून 120 अंश अंतरावर असतात तेव्हा भूकंपासारखी घटना तसे अग्नीतांडव इ. घटना घडू शकतात. क्रोधाची परिसीमाही गाठली जाते. गुरू ग्रह – संयमाचा कारक, धर्माचा कारक, ज्ञानाचा कारक ग्रह आहे. 15 मे 2025 पर्यंत त्याचा शत्रू ग्रह म्हणजे शुक्राच्या राशीत आहे. नंतरही तो शत्रू ग्रह बुध राशीत असणार आहे. 15 मे पर्यंत गुरू हर्षलयुक्त असल्याने फार काही विवेकाने वागणार नाहीत. त्यामुळे धार्मिक वाद, मंगळवामुळे तसेच शनि-राहू मुळे हिंसक वळण घेऊ शकते.
आताचे सूर्यग्रहण जे मीन राशीत होत आहे त्यामुळे