सगळीकडे चंद्रग्रहणाची खूप चर्चा चालू आहे कारण हे आपल्याला भारतातून दिसणार आहे ग्रहणाची बद्दलची माहिती खगोलीय शास्त्रानुसार आपण अनेक ठिकाणी वाचतो आणि ती लहानपणी पण शिकलेली आहेत परंतु त्याच्यामध्ये अनेक ज्योतिषी किंवा तज्ञ लोक आपल्याला असं सांगतात की ग्रहण काळामध्ये काही पथ्य पाळावेत काही गोष्टी करू नयेत या मागचा काय एक विचार असू शकतो हा आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया
ग्रहण हे चंद्र बरोबर राहू अंशात्मक युती एका राशीत जेव्हा करतो तेव्हा आपल्याला चंद्रग्रहण होते असे आपण म्हणतो आता इथे समजून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे आणि राहू हा राक्षसी डोकं आहे किंवा त्याला सापाचं डोकंही म्हटलं जातं विषारी आहे जेव्हा मन आणि अशा प्रकारचा हा ग्रह राहू एकत्र येतो तेव्हा त्या वेळेला मनामध्ये येणाऱ्या कल्पना विचार हे सगळे काल्पनिक आणि वाईट विचारांचे किंवा दुसऱ्याला त्रासदायक होणारे असे येऊ शकतात म्हणून मन स्थिर राहण्यासाठी ह्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त नामस्मरण पूजाअर्चा अशा केल्या जातात हे झाले कर्मकांड ज्यामुळे मनुष्याचे मन परमेश्वराच्या स्मरणात त्याच्या जाणिवेत त्याच्या चरणाशी रहावे आणि त्याच्या मनामध्ये चुकीचे किंवा वाईट विचार येऊ नयेत त्याच्याकडून चुकीची कर्म होऊ नयेत हा त्यामागचा साधा सरळ अर्थ होय
मग अनेक जण म्हणतात की या वेळेला मंत्र सिद्ध होतात किंवा तुम्हाला एक प्रकारची साधना जास्तीत जास्त प्राप्त होते याला कारण असं की तुम्ही सलग काही काळ एका ठिकाणी बसून एकाग्र चित्ताने अतिशय ओढीने ते कार्य करायला लागल्यावर तुम्हाला ते साध्य होतं म्हणून ग्रहण काळामध्ये अशा प्रकारची कर्म केली जातात
गर्भवती स्त्रियांच्या बाबतीमध्ये विशेष करून काळजी घ्यायला सांगतात घराबाहेर पडू नका किंवा कुठलंही अन्न सेवन करताना ग्रहणाचे वेध लागले की त्यानंतर काही खाऊ नका असं सांगण्यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे
राहू हा ग्रह मुळातच विषारी आहे आपल्याला जे आजार होतात ह्या आजारांचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे हा राहू आहे.कारण आजार हा आपल्या दृष्टीने तर विषारीच प्रकार आहे अगदी कोरोना काळात सुद्धा राहू हा महत्त्वाची भूमिका दर्शवित होता आणि तो मिथुन राशीत होता आणि त्याचमुळे आपण नाक – तोंड आपलं सगळं बंद केलं गेलं होतं जेणेकरून व्हायरल त्यातून होत होता. वायू तत्वाची मिथुन रास आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्याचा संसर्ग होत होता
असा हा राहू, जेव्हा चंद्राच्या ग्रहणाच्या कालावधीमध्ये त्याचं बळ वाढतं आणि वेध लागल्यापासून हवे मधलं कीटक किंवा आपण म्हणूयात प्रदूषण या सगळ्या गोष्टी वृद्धिंगत होतात. आपण जेव्हा अन्न सेवन करतो तेव्हा ते आपल्या मुखातून आत जातं हा त्यामागचा साधा सरळ विचार आहे. हा प्रॅक्टिकली किती शक्य आहे हा भाग वेगळा. या कालावधीमध्ये अन्न शिजवू नये ते खाऊ नये हे सांगण्यामागचा हा साधा सरळ विचार आहे. ते अन्न बनवताना सुद्धा तुमच्या मनात येणारे वाईट विचार, चिंता, दुःख हे काही जे निर्माण होतं त्यांना प्रत्येकाच्या पोटात जाऊ नये,हा पण त्या मागचा एक विचार आहे.
गर्भवती स्त्रियांच्या बाबतीमध्ये गर्भ अतिशय सेन्सेटिव्ह असतो आणि या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अन्नाचे सेवन करून त्याला काही विषय युक्त किंवा म्हणजे त्रासदायक असं त्या गर्भवतीला होऊ नये हे या मागचं सांगण्याचं कारण आहे जेव्हा मुळातच चंद्रची स्थिती बिघडलेली असते म्हणजेच मनाची स्थिती बिघडलेली असते त्यावेळेला अपघात होणं, भांडणं होणं किंवा आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडणं अनवधानाने त्या घटना घडणार, या होऊ शकतात आणि या कालावधीमध्ये गर्भवतीने बाहेर पडल्यानंतर कुठे अपघात चे भय नको, कुठे कोणी काही तिला चुकीचं बोलून तिचं मन दुखी व्हायला नको, अशा सगळ्या त्या मागच्या कल्पना आहेत.
म्हणून आता नोकरी करणारे घरात बसू शकतात का? तर नाही पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी ती काळजी घ्यावी असा या मागचा विचार आहे.आता ग्रहणामध्ये नक्की काय घडतं तर चंद्राच्या बरोबर समोर रवी असतो कारण पौर्णिमेलाच चंद्रग्रहण असं घडू शकतं. पौर्णिमेला आणि अमावस्येला गुरुत्वाकर्षण हे प्रचंड प्रमाणात वाढतं, अशा कालावधीमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे गर्भवती स्त्रियांचं गर्भपात होणं किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार तो होऊ नये म्हणून त्यांनी स्थिर बसावं शांत बसावं कुठल्याही प्रकारची दगदग करू नये हे सांगण्यामागचं कारण आहे तसेच वृद्ध व्यक्तींनाही अमावस्या पौर्णिमा ज्या वेळेला गुरुत्वाकर्षणाचे प्रमाण जास्त असतं त्या कालावधीमध्ये त्यांच्या तब्येतीचे उतार -चढाव हा जास्त प्रमाणात होतो अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर ह्या कालावधीच्या कालावधीमध्ये बरेच वेळा जन्म जास्त होताना दिसतात अथवा मृत्यूही जास्त होताना दिसतात हा सर्व गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो . आता तुम्ही म्हणाल की असा एवढा चंद्र लांब आहे आणि असा परिणाम कसा काय होतो तर गुरुत्वाकर्षणाच्यामुळे म्हणजे चंद्राच्या कला आहेत त्याच्यामुळे आपल्याला समुद्राला भरती ओटी येताना दिसते.समुद्रामध्ये काय आहे तर पाणी आहे.पाण्याचा चढ-उतार हा आपल्याला या भरती ओटीतनं दिसतो आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे म्हणजेच रक्त आहे त्यामुळे जसा समुद्रावर परिणाम होतो तसाच पौर्णिमा अमावस्येला किंवा ह्या कालावधीमध्ये मनुष्याच्या शरीरावर पण परिणाम होताना दिसतो मनाला सुद्धा लहरी आहे त्या सुद्धा लहरी वर – खाली होताना दिसतात. अनेक लोकांच्या बाबतीमध्ये असं निदर्शनास येतं की काही ठराविक दशांमध्ये एखादी व्यक्ती अमावस्येला खूप चिडचिड करते,खूप भांडते, तिचं मन सैरभैर झालेलं असतं तर हा सगळा चंद्राचा आणि त्यावर असलेल्या अशुभग्रहांचा परिणाम दिसून येतो
आता तुमच्या लक्षात आलं असेल की ग्रहण काळामध्ये हे एवढी पथ्य किंवा याबद्दलची सगळी माहिती का दिली जाते,तर ह्या माहितीच्या आधारे आपण आपल्याला सुरक्षित ठेवता याव, त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून या गोष्टी सांगितल्या जातात. पण लहान बाळ, वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती स्त्री यांना भुकेचे नियंत्रण ठेवता येणार नाही आणि त्यांनी ठेवू पण नाही म्हणून मग काय सांगितलं जातं की त्या कालावधीमध्ये हलका आहार घ्यावा, हलक आहार घेतला की माणसाचं मन सुद्धा हलकं राहतं हे त्यामागे सांगण्याचा शास्त्रीय उद्देश आहे. या ग्रहणाच्या बद्दलच्या सर्व माहिती मध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये ग्रहणाबद्दल ची माहिती दिलेली आहे किंवा काही नियम घालून दिलेले आहेत हे आपल्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीचा विचार करून सुरक्षिततेसाठीच सांगितलेला आहे. तर सगळ्यांनी ही माहिती समजून घ्या आपल्या रोजच्या धकाधडीच्या कामाच्या स्वरूपामध्ये जे जे शक्य असेल ते करा. असंच केलं नाही, तसंच केलं नाही, या चौकटीत न अडकता शास्त्र समजून ते पटवून घेण्याचा प्रयत्न करा
आता या ग्रहणाचा परिणाम हा जगाच्या पटलावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो ह्या कालावधीमध्ये भूकंप होणार, मोठ्या प्रमाणावर मृत्यू होणं, रेल्वेचे अपघात होणं, अग्नी तांडव, अती वृष्टी होणे तसेच ज्या देशांच्या कुंडल्यानुसार त्यातल्या तिथल्या सरकारवर किंवा तिथल्या तिथल्या सामाजिक जीवनावर मोठ्या प्रमाणावर ताण येताना अथवा मोठ्या घटना घडताना दिसतात म्हणून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रहण याला खूप महत्त्व आहे
ज्योतिष शास्त्री आभा करंदीकर
@-anucharaniabhashri6649
https://www.facebook.com/jyotishshashtriabha.karandikar